Gadchiroli

गडचिरोली जिल्हा”Student Police cadet Program” या उपक्रमांतर्गत दि. 26 जानेवारी 2025 रोजी पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे SPC कॅडेट विद्यार्थी परेड संचलनात सहभागी होऊन उत्कृष्ठपणे प्रदर्शन करण्यात आले.

Read Full Story

उप पोस्टे पेंढरी अंतर्गत प्रजासत्ताक दिनानिमित शासकीय आश्रम शाळा पेंढरी येथील वर्ग 8 वी व वर्ग 9 वी च्या विद्यार्थ्यांना उप पोस्टे येथे ध्वजारोहण कार्यक्रमाकरीता बोलावून स्टुडंट पोलीस कॅडेड उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून पथसंचन (परेड) चे आयोजन करून परेड घेण्यात आली.

Read Full Story

“स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम” उपक्रमा अंतर्गत गडचिरोली पोलीस दलातर्फे मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांच्या मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा. अपर पोलीस अधीक्षक मा. यतीश देशमुख सा. अपर पोलीस अधीक्षक मा. रमेश सा. यांचे मर्गदर्शनाखालीदिनांक 26/12/2023 ते 30/12/2023 पर्यंत पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे पाच दिवसीय “निवासी प्रशिक्षण शिबीराचे”(RTC Camp) आयोजन करण्यात आले आहे.या पाच दिवसीय आयोजीत शिबीरामधील आज तिसरा दिवस असून,आज दिनांक 28/12/2023 रोजी सकाळी योगा,पिटी,पथसंचलन सराव घेण्यात आला.त्यानंतर पोउपनि. रामदास ढोके व त्यांच्या पथकाकडुन श्वान पथकाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. प्रात्यक्षिकामध्ये बॉम्ब शोध व गुन्ह्याच्या तपासात श्वानाचे काय महत्व आहे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.त्यानंतर नितीतत्वे, संयम, सहनशिलता, संवेदना, सहानुभुती, वडीलधा­री व्यक्ती यांचा आदर या विषयावर सपोनि. सदाशिव देशमुख सा., शिस्त संघभावना, दृष्टीकोन या विषयावर शिक्षणाधीकारी (माध्य.) जिल्हा परिषद तथा एस.पी.सी. सदस्य गडचिरोली श्री. वैभव बारेकर सा. भ्रष्टाचार विरोधी लढा या विषयावर ला.लु.प्र.वि. गडचिरोलीचे पोनि. शिवाजी राठोड सा. तसेच महाराष्ट्र पोलीस, गुन्हे प्रतिबंध व उपाययोजना या विषयावर स्था.गु.शा.चे पोनि. उल्हास भुसारी सा.व कम्युनिटी पोलीसींग या विषयावर मा.अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) तथा सदस्य सचिव एस.पी.सी गडचिरोली श्री. कुमार चिंता सा. यांनी मार्गदर्शन केले.त्यानंतर 100 मीटर धावण्याची स्पर्धा, 400 मीटर 4 ×100 रीले स्पर्धा, कबड्डी व व्हालीबॉल स्पर्धा इ.सांघीक खेळ घेण्यात आले.रोल कॉल घेवून तीसरे दिवसाची सांगता करण्यात आली.

Read Full Story

गडचिरोली पोलीस दलातर्फे दिनांक 26/12/2023 ते 30/12/2023 पर्यंत प्रथमत:च पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे स्टुडंट पोलीस कॅडेट उपक्रमांतर्गत पाच दिवसीय “निवासी प्रशिक्षण शिबीर” संपन्न झाले.दि. 30/12/2023 रोजी निवासी प्रशिक्षण शिबीराचे समारोप प्रसंगी मा.पोलीस अधीक्षक नीलोत्पल साहेब यांचे निरिक्षणाखाली व अप्पर पोलीस अधीक्षक कुमार चिंता साहेब अपर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख साहेब अपर पोलीस अधीक्षक एम रमेश साहेब यांचे उपस्थितीत स्टुडंट पोलीस कॅडेट यांचे शिस्तबध्द पथसंचलन पार पडले.

Read Full Story

गडचिरोली पोलीस दलातर्फे दिनांक 26/12/2023 ते 30/12/2023 पर्यंत प्रथमत:च पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे स्टुडंट पोलीस कॅडेट उपक्रमांतर्गत पाच दिवसीय “निवासी प्रशिक्षण शिबीर” संपन्न झाले.दि. 30/12/2023 रोजी निवासी प्रशिक्षण शिबीराचे समारोप प्रसंगी मा.पोलीस अधीक्षक नीलोत्पल साहेब यांचे निरिक्षणाखाली व अप्पर पोलीस अधीक्षक कुमार चिंता साहेब अपर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख साहेब अपर पोलीस अधीक्षक एम रमेश साहेब यांचे उपस्थितीत स्टुडंट पोलीस कॅडेट यांचे शिस्तबध्द पथसंचलन पार पडले. यानंतर मान्यवरांकडून कॅडेट नी तयार केलेले टेन्ट सुशोभिकरणाचे निरिक्षण करण्यात आलेयानंतर एकलव्य हॉल येथे बक्षीस वितरण व समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता सा. सदस्य स्टुडंट पोलीस कॅडेट जिल्हा गडचिरोली यांनी करुन विद्यार्थ्यांनी केलेल्या पथसंचलनाचे कौतुक केले.स्टुडंट पोलीस कॅडेटच्या लोगोमधील इंम्पेथी, इंटेग्रिटी व डिसीप्लीन या शब्दांचे अर्थ सांगून पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या. त्यांनतर स्टुडंट पोलीस कॅडेट प्रशिक्षणाकरीता आलेल्या काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, गडचिरोली पोलीस दलातील जवानांनी आपल्या संरक्षणाकरीता त्यांच्या प्राणाची आहुती दिली. तसेच पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे पाच दिवसीय रेसीडेंशियल ट्रेनिंग कॅम्प हा आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव असेल याशिबीरामध्ये काय- काय शिकायला मिळाले याबाबत सांगुन गडचिरोली पोलीस दलाचे आभार मानलेे. त्यानंतर मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांनी आपल्या समारोपीय भाषणात विद्यार्थ्यांनी केलेल्या पथसंचलन व टेन्ट सुुशोभिकरणातील नाविन्यपुर्ण कल्पनेचे कौतुक करत विद्यार्थ्यांना सांगीतले की, विद्यार्थ्यांना घडविण्याचे महत्वाचे कार्य शिक्षक आणि पालक करत असतात. विदयार्थी हे मातीचा गोळा असुन त्याला मुर्ती बनवुन सजविण्याचे कार्य शिक्षक करत असतात विद्यार्थांनी आपले स्वप्न हे डोळे उघडे ठेवुन बघावेत आणि स्वप्न पुर्ण होई पर्यंत कठोर मेहनत करावे यासोबतच सर्व विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या शिबीरामध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा व कार्यक्रमामध्ये गुणानुक्रमाने क्रमांक पटकाविना­रे शाळेच्या विद्यार्थ्यांना पारितोषिक, रोख रक्कम व सन्मानचीन्ह देवुन गौरविण्यात आले. त्यामध्ये बेस्ट स्टुडंट कॅडेट पुरुष -पुष्कर पारधी, जवाहर नवोदय घोट, बेस्ट स्टुडंट कॅडेट महिला – सुशिला निकेसर, जि. प. हायस्कुल धानोरा, बेस्ट टेन्ट सुशोभिकरण – जि. प. हायस्कुल धानोरा, बेस्ट पथसंचालन- जवाहर नवोदय घोट व सर्वोत्कृष्ट संघ – जि. प. हायस्कुल धानोरा यांना रोख रक्कम, सन्मानचीन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात आले. तसेच कबड्डी, व्हालीबॉल, 100 मी धावने, 400 मी. 4×100 रीले, वक्तृत्व, गायन, समुहनृत्य, पथनाट्य वाद-विवाद स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय येणा­रे विदयार्थ्यांना बक्षीस व प्रशस्तीपत्र देवुन सन्मानीत करण्यात आले. यासोबतच सर्व सहभागी दहा शाळेमधील 300 विद्यार्थ्यांना ग्रुप फोटो व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आलेसदर कार्यक्रम मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा.,व अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. एम रमेश सा. यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली श्री. मयुर भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा श्री. साहिल झरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड श्री. नितीन गणापुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जिमलगट्टा श्री. सुजित क्षिरसागर, उपविभागीय पोलीस अधिकारी हेडरी श्री. बापुराव दडस, व सर्व पोलीस अधीक्षक कार्यालयातील अधिकारी व अंमलदार तसेच एस.पी.सी. समन्वयक अधिकारी, अंमलदार व शाळेतील समन्वयक शिक्षक यांचे उपस्थितीत पार पडला.सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता नागरी कृती शाखेचे अधिकारी सर्व पोलीस अंमलदारांनी विशेष परीश्रम घेतले

Read Full Story

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक गडचिरोली यांनी दिनांक 10/08/2023 रोजी शासकीय इंग्रजी आश्रम शाळा नवेगाव येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान परीक्षा घेण्याचा शुभारंभ करण्यात आला. सदर प्रयास उपक्रम अंतर्गत दररोज एस पी सी शाळेतील विद्यार्थ्यांना  स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर सामान्य ज्ञानावरील प्रश्न दररोज उत्तरासह पाठविले जाऊन त्यांना भविष्यात स्पर्धा परीक्षेची अडचण येऊ नये म्हणून तयारी करवुन घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गडचिरोली पोलिसांची शहीद गॅलरी असलेले शौर्य स्थळ येथे विद्यार्थ्यांची भेट घडवून आणण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक गडचिरोली यांनी दिनांक 26/07/023 रोजी जिल्हा परिषद हायस्कूल sironcha येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशन चे कामकाज, आई वडील व गुरु यांचा मानसम्मान, बालविवाह, महिला व बालकाची सुरक्षीतताबाबत प्रशिक्षण देण्यात आले व शाळेला पुस्तके वाटप करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक गडचिरोली यांनी दिनांक 26/07/023 रोजी जिल्हा परिषद शाळा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना “पोलीस गुन्हा प्रतिबंधक व नियंत्रण” या विषयावर अंतरवर्ग प्रशिक्षण घेण्यात आले. यामध्ये उपस्थित विद्यार्थ्यांना गुन्हास प्रतिबंध, आरोपी शोध आणि तपास, कायद्याची अंमलबजावणी, गुन्ह्याची व्याख्या, गुन्ह्याचे वर्गीकरण, एफ. आय. आर. म्हणजे काय याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पोलीस कार्यात विद्यार्थी कशी मदत करू शकतील याबाबत विद्यार्थ्यांची गटचर्चा आयोजित करण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story

‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक गडचिरोली यांनी दिनांक 18/03/2023 रोजी जिल्हा परिषद शाळा एटापल्ली येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांचे बाह्यवर्ग प्रशिक्षण घेण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story

‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक गडचिरोली यांनी दिनांक 16/03/2023 रोजी जिल्हा परिषद शाळा धानोरा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांचे बाह्यवर्ग प्रशिक्षण घेण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story

‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक गडचिरोली यांनी दिनांक 25/02/2023 रोजी जिल्हा परिषद शाळा एटापल्ली येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचे बाह्यवर्ग प्रशिक्षण घेण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story

‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक गडचिरोली यांनी दिनांक 08/03/2023 रोजी जिल्हा परिषद शाळा धानोरा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना बाह्यवर्ग प्रशिक्षण घेण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story

‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक गडचिरोली यांनी दिनांक 28/02/2023 रोजी जिल्हा परिषद शाळा एटापल्ली येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना बाह्यवर्ग प्रशिक्षण घेण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story

‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक गडचिरोली यांनी दिनांक 01/03/2023 रोजी जिल्हा परिषद शाळा एटापल्ली येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना बाह्यवर्ग प्रशिक्षण घेण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story