” स्टुडंट पोलीस कॅडेट” उपक्रमा अंतर्गत मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचे संकल्पनेतून विद्यार्थ्यांसाठीराईट टर्नहा नाविन्यपूर्ण उपक्रम
दिनांक 08/10/2024 रोजी सकाळी 10.00 वाजता मनपा माध्यमिक विद्यालय, कार्बन नाका शिवाजीनगर येथे विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. कार्यक्रमाचे उदघाटन सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.चंद्रकांत खांडवी…
दिनांक १५/०८/२०२४ रोजी सकाळी ०८०० वाजता पोलीस आयुक्त कार्यालय, नाशिक शहर येथे “स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम” उपक्रमांतर्गत गृह मंत्रालय,भारत सरकार,नवी दिल्ली यांचे मार्फत सरकारी शाळांतील इयत्ता ८ वी व ९ वी चया वर्गातील विद्यार्थ्यांसाठी पोलीस दलाच्या आधुनिकीकरण अंतर्गत” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम” हा संपूर्ण देशभरात शालेय शिक्षणासोबत राबविण्यात येत आहे. सदर कार्यक्रमाचा उद्देश शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चांगले नीतिमूल्य रुजवून जबाबदार नागरिक बनविणे आहे. महाराष्ट्र राज्यातील सरकारी शाळांमध्ये इयत्ता ८वी व ९वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम राबविण्यात येत असून त्या अंतर्गत गुन्ह्यांना प्रतिबंध, रस्ते सुरक्षा व वाहतूक जागरूकता, भ्रष्टाचार निर्मूलन, संवेदनशीलता व सहानुभूती, महिला व बालकांचे सुरक्षितता समाजाचा विकास दुष्ट सामाजिक प्रकृतीस प्रवृत्तीस आळा घालने, नीती मूल्य, शिस्त, आपत्ती व्यवस्थापन व स्वच्छता , बाह्यवर्ग प्रशिक्षण इत्यादी विषयांचे प्रशिक्षण देण्यात येते.
सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षांमध्ये नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील१४ शाळांमध्ये अंतर वर्ग व बाह्य वर्ग प्रशिक्षणाचे काम सन २०१९ पासून पोलीस हवालदार १८५ सचिन जाधव नियमितपणे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.…