दिनांक 09.10.2024 रोजी विधान भवन येथे एस.पी.सी. या उपक्रमांतर्गत शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली होती. या शैक्षणिक भेटीमध्ये मुंबई म.न.पा. च्या 10 शाळातील एसपीसीच्या 200 विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष विधान भवन पाहण्याची संधी मिळाली. यावेळी विधान भवन, विधान सभा, मध्यवर्ती सभागृह यातील कामकाज कसे चालते याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांना या सर्व गोष्टींचा आनंद आणि अनुभव प्रत्यक्षात घेता आला.
सदर कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शन श्री जितेंद्र भोळे मा. सचिव (विधानसभा) आणि श्री. निलेश मदने संचालक, वी.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय तसेच श्रीमती. साने मॅडम व इतर मान्यवर यांच्यामार्फत…