सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षांमध्ये नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील१४ शाळांमध्ये अंतर वर्ग व बाह्य वर्ग प्रशिक्षणाचे काम सन २०१९ पासून पोलीस हवालदार १८५ सचिन जाधव नियमितपणे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, प्रशिक्षण व खास पथके,महाराष्ट्र राज्य,मुंबई यांचे आदेशान्वये शैक्षणिक वर्ष २०२३-२४मध्ये’ स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम” उपक्रमा अंतर्गत १४ शाळांचे मूल्यमापन करून खालील ३ शाळांची निवड करण्यात आली आहे.
मनपा माध्यमिक विद्यालय, अंबड गाव, नाशिक- प्रथम क्रमांक
मनपा माध्यमिक विद्यालय, कार्बन नाका, नाशिक -द्वितीय क्रमांक
मनपा उर्दू शाळा, बडी दर्गा नाशिक -तृतीय क्रमांक
मा. श्री संदीप कर्णिक,भापोसे पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचे हस्ते वरील शाळेच्या मुख्याध्यापकांना सन्मानित केले आहे.सदर कार्यक्रमासाठी श्री चंद्रकांत खांडवी, पोलीस उपायुक्त ,मुख्यालय व वाहतूक सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार कार्यक्रमासाठी हजर होते.

