आदरणीय सर,
आज रोजी प्रजासत्ताक दिना निमित्त पोलिस मुख्यालय, पोलीस कवायत मैदान, वाशिम येथे आयोजित पथसंचलन/परेड मध्ये वाशिम जिल्ह्या अंतर्गत येणाऱ्या 8 शाळांचे आठवी व नववीचे वर्गाचे SPC विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचे एकूण 3 प्लाटून सहभागी होते.
सदर परेड दरम्यान SPC प्लाटूनने अत्यंत उत्कृष्ट रित्या पथसंचलन केले. तसेच ग्रुप ऍक्टिव्हिटी सादर केली. कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी SPC प्लाटूनचे तसेच ग्रुप ऍक्टिव्हिटी चे कौतुक व अभिनंदन केले आहे.
करीता सविनय सादर..
