“स्टुडंट पोलीस कॅडेट” विद्यार्थ्यांची स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मस्थान, भगूर व स्वातंत्र्यवीर सावरकर प्रथम शाळेत शिकले त्या शाळेला भेट .🌷आज दि .८ फेब्रुवारी २०२५ रोजी आदरणीय मा श्री संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर मा .श्री चंद्रकांत खांडवी, पोलीस उपायुक्त, नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाने “स्टुडंट पोलीस कॅडेट ” उपक्रमांतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, अंबडगाव येथील 60 विद्यार्थी यांना शासकीय वाहनाने स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मस्थान, भगूर येथे भेट देण्यात आली . वाड्याची माहिती, वाड्याच्या परिसर याची माहिती श्री विजय कुवर यांनी दिली. स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रथम शाळा,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भगुर येथे भेट दिली. शाळेचे महत्व जाणून घेतले .तसेच शाळेत अनेक विद्याथी घडले मोठ्या पदावर माजी विद्यार्थ्यांचा इतिहास समजून घेतला . स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कार्य, विद्यार्थी कसा असावा शिक्षणाचे महत्व भावी पिढी आदर्श नागरिक असावी असे संस्कार देणारा स्तुत्य उपक्रम सन्मानीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांचे संकल्पनेतून राबवला जातो .याचे नाशिककरांना कौतुकास्पद आहे. तसेच राम मंदिर परिसरात भेट देण्यात आली. तेथील पुजारी यांनी भगूर गावाचा इतिहास गावाचे नाव कसे पडले व प्रभू श्रीरामचंद्र यांचे वास्तव्य याबाबत सखोल माहिती दिली. शाळेचे शिक्षक श्री .संजय वाघ सर . श्रीमती सोनाली साळवे .मॅडम केंद्र प्रमुख श्री राठोड सर, श्री .जितेंद्र मानकर सर, श्री टोपले सर,. श्री मनोजभाऊ कुवर, स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान, श्री.आकाश पुजारी तसेच श्री.अमित कस्तुरे, युनायटेड वे फाउंडेशन, नाशिक शाळेचे शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते .