दिनांक 08/10/2024 रोजी सकाळी 10.00 वाजता मनपा माध्यमिक विद्यालय, कार्बन नाका शिवाजीनगर येथे विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. कार्यक्रमाचे उदघाटन सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.चंद्रकांत खांडवी साहेब, पोलीस उपायुक्त, मुख्यालय व वाहतूक, नाशिक शहर प्रमुख पाहुणे श्री सुधाकर सुरुडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त,शहर वाहतूक विभाग, नाशिक शहर व श्री. बी. टी. पाटील, साहेब शिक्षणाधिकारी मनपा नाशिक यांचें शुभहस्ते करण्यात आले. नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 8 वी च्या मुलींनी 26 जानेवारी 2024 च्या परेड मध्ये सहभागी झाल्याबद्दल प्रशिस्तपत्र देउन सन्मानित करण्यात आले तसेच 9 वी 10 वी च्या मुलांनी एस पी सी प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत खांडवी पोलीस उपायुक्त, नाशिक शहर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले योग्य मार्गाने, चांगली संगत असल्यास यश नक्की मिळेल असे सांगितले तसेच सायबर क्राईम, गुड टच बॅद टच, व्यसनाचे दुष्परिणाम, महीला सुरक्षा, वाहतुकीचे नियम, विवीध गुन्हे व शिक्षा याबाबत मार्गदर्शन केले प्रमुख अतिथी शिक्षणाधिकारी श्री. बी. टी. पाटील यांनी स्टूडेंट पोलिस कॅडेट प्रोगामच्या उपक्रमातील सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले योग्य दिशेने, योग्य मार्गाने प्रयत्न केल्यास यश नक्की मिळेल , राईट टर्न उपक्रमाची माहिती घेतली व कौतुक केले कार्यक्रम प्रसंगी केंद्रप्रमुख श्री. प्रकाश शेवाळे, मुख्याध्यापक श्री अरुण दातीर, श्री रहाणे, श्रीमती स्मिता खैरनार , श्रीमती छाया गोसावी, नाशिक पोलिस हवालदार सचिन जाधव , श्री सुरेश खांडबहाले, विठ्ठल भोये, कमलेश खैरनार उपस्थित होते. सुत्रसंचालन श्री पाखलेसर,प्रास्ताविक श्री सचिन जाधव पोलीस हवालदार, एसपीसी प्रोग्राम, आभार श्री खांडबहाले यांनी मानले.



