

दिनांक 6 फेब्रुवारी 2025 रोजी जिल्हा परिषद शाळा खामसवाडी ता.कळंब जि. धाराशिव येथे Student Police Cadet अंतर्गत विद्यार्थी मार्गदर्शन करण्यात आले. यात बालकामगार, बालगुन्हेगारी, शारिरीक सुरक्षा, लैंगिक सुरक्षितता, पोलीस प्रशासनाचे योगदान बाबत पोलीस उपनिरीक्षक इकबाल सय्यद यांनी मार्गदर्शन केले. तसेच, रहदारी नियम, हेल्मेटचा वापर, वाहन चालविताना घ्यावयाची काळजी, मोबाईलचा वापर, स्वतःचे वडिल धा-यांचा आदर, शिस्त या बाबत चे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पोलीस नाईक सारफळे यांनी केले. या वेळी सर्व शिक्षक वृंद हजर होते.
