दिनांक 01/01/2025 ते 31/01/2025 रोजी पावेतो “राष्ट्रीय रस्ता सुरक्षा 2025″आयोजित करणे बाबत मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर , यांचे आदेशान्वये “रस्ता सुरक्षा अभियान 2025″ साजरा करणे बाबत आदेश झाले होते त्या अनुषंगाने दिनांक 27/01/25 रोजी सकाळी 1030 वाजता, ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम ” उपक्रमा अंतर्गत मनपा उर्दू शाळा , बडी दर्गा , नाशिक येथील 20 विद्यार्थ्यांनी नवीन खडकळी सिग्नल येथे जे वाहन चालक नियम पाळत नाही त्यांना आरसा दाखवून वाहतुकीचे नियम पाळण्याचे महत्त्व पटवून दिले तसेच विविध वाहतूक नियमांचे पोस्टरद्वारे नागरिकांना माहिती देऊन जनजागृती केली.