You are currently viewing दिनांक १५/०८/२०२४ रोजी सकाळी ०८०० वाजता पोलीस आयुक्त कार्यालय, नाशिक शहर येथे “स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम” उपक्रमांतर्गत गृह मंत्रालय,भारत सरकार,नवी दिल्ली यांचे मार्फत सरकारी शाळांतील इयत्ता ८ वी व ९ वी चया वर्गातील विद्यार्थ्यांसाठी पोलीस दलाच्या आधुनिकीकरण अंतर्गत” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम” हा संपूर्ण देशभरात शालेय शिक्षणासोबत राबविण्यात येत आहे. सदर कार्यक्रमाचा उद्देश शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चांगले नीतिमूल्य रुजवून जबाबदार नागरिक बनविणे आहे. महाराष्ट्र राज्यातील सरकारी शाळांमध्ये इयत्ता ८वी व ९वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम राबविण्यात येत असून त्या अंतर्गत गुन्ह्यांना प्रतिबंध, रस्ते सुरक्षा व वाहतूक जागरूकता, भ्रष्टाचार निर्मूलन, संवेदनशीलता व सहानुभूती, महिला व बालकांचे सुरक्षितता समाजाचा विकास दुष्ट सामाजिक प्रकृतीस प्रवृत्तीस आळा घालने, नीती मूल्य, शिस्त, आपत्ती व्यवस्थापन व स्वच्छता , बाह्यवर्ग प्रशिक्षण इत्यादी विषयांचे प्रशिक्षण देण्यात येते.

दिनांक १५/०८/२०२४ रोजी सकाळी ०८०० वाजता पोलीस आयुक्त कार्यालय, नाशिक शहर येथे “स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम” उपक्रमांतर्गत गृह मंत्रालय,भारत सरकार,नवी दिल्ली यांचे मार्फत सरकारी शाळांतील इयत्ता ८ वी व ९ वी चया वर्गातील विद्यार्थ्यांसाठी पोलीस दलाच्या आधुनिकीकरण अंतर्गत” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम” हा संपूर्ण देशभरात शालेय शिक्षणासोबत राबविण्यात येत आहे. सदर कार्यक्रमाचा उद्देश शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चांगले नीतिमूल्य रुजवून जबाबदार नागरिक बनविणे आहे. महाराष्ट्र राज्यातील सरकारी शाळांमध्ये इयत्ता ८वी व ९वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम राबविण्यात येत असून त्या अंतर्गत गुन्ह्यांना प्रतिबंध, रस्ते सुरक्षा व वाहतूक जागरूकता, भ्रष्टाचार निर्मूलन, संवेदनशीलता व सहानुभूती, महिला व बालकांचे सुरक्षितता समाजाचा विकास दुष्ट सामाजिक प्रकृतीस प्रवृत्तीस आळा घालने, नीती मूल्य, शिस्त, आपत्ती व्यवस्थापन व स्वच्छता , बाह्यवर्ग प्रशिक्षण इत्यादी विषयांचे प्रशिक्षण देण्यात येते.

  • Post author:
  • Post category:Nashik City

सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षांमध्ये नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील१४ शाळांमध्ये अंतर वर्ग व बाह्य वर्ग प्रशिक्षणाचे काम सन २०१९ पासून पोलीस हवालदार १८५ सचिन जाधव नियमितपणे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, प्रशिक्षण व खास पथके,महाराष्ट्र राज्य,मुंबई यांचे आदेशान्वये शैक्षणिक वर्ष २०२३-२४मध्ये’ स्टुडन्ट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम” उपक्रमा अंतर्गत १४ शाळांचे मूल्यमापन करून खालील ३ शाळांची निवड करण्यात आली आहे.

1️⃣ मनपा माध्यमिक विद्यालय, अंबड गाव, नाशिक- प्रथम क्रमांक

2️⃣मनपा माध्यमिक विद्यालय, कार्बन नाका, नाशिक -द्वितीय क्रमांक

3️⃣ मनपा उर्दू शाळा, बडी दर्गा नाशिक -तृतीय क्रमांक

मा. श्री संदीप कर्णिक,भापोसे पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचे हस्ते वरील शाळेच्या मुख्याध्यापकांना सन्मानित केले आहे.सदर कार्यक्रमासाठी श्री चंद्रकांत खांडवी, पोलीस उपायुक्त ,मुख्यालय व वाहतूक सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार कार्यक्रमासाठी हजर होते.