छत्रपती संभाजी नगर शहर
दिनांक – 16/12/2025 रोजी सिडको वाहतूक विभाग यांनी (SPC) स्टुडन्ट पोलीस कॅडेट अंतर्गत न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय हरसुल,छत्रपती संभाजी नगर येथील इयत्ता आठवी व नववी चे विद्यार्थी यांना स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यक्रमा बाबत माहिती देऊन विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा च्या अनुषंगाने सायबर हेल्पलाइन क्रमांक 1930 व सायबर फ्रॉड च्या बाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच आपत्ती व्यवस्थापन नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्ती पासून सुरक्षा व उपायोजना बाबत माहिती दिली. रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता , वाहतूक नियम न पाळता होणारे दंड, अपघातास कारणीभूत बाबी, त्यापासून वाचण्यासाठी उपायोजना बाबत मार्गदर्शन केले.
तसेच विद्यार्थ्यांना व्यायामाचे महत्व, योगा बाबत माहिती दिली तसेच 112 डायल,ई-चलन डिव्हाईस बाबत माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांकडून वाहतूक सिग्नल वरील नियमाचे सांकेतिक इशारे/हातवारे बाबत प्रात्यक्षिक करून घेण्यात आले.