दिनांक-30/12/2024 रोजी (SPC) स्टुडंट पोलीस कॅडेट अंतर्गत छावणी वाहतूक विभाग यांनी मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय बन्सीलाल नगर, येथे, इयत्ता आठवी इयत्ता नववी चे विद्यार्थ्यांना, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता व आपत्ती व्यवस्थापन बाबत माहिती दिली.18 वर्षाखालील विद्यार्थी मुलांनी सार्वजनिक ठिकाणी वाहन न चालवण्याबाबत तसेच मो.सा. चालक यांनी हेल्मेट परिधान करणे व पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीला देखील हेल्मेटअनिवार्य आहे बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.




